aadhaar card new update आधार कार्ड हे भारतातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा महत्त्वाच्या सरकारी कामांसाठी ओळख पुरवायची असेल, तर आधार आवश्यक असते. हे केवळ ओळखपत्र नसून, देशातील लोकसंख्या आणि विविध योजनांची माहिती ठेवण्यासाठीही उपयोगात येते. अनेक शासकीय आणि खासगी सेवांसाठी आधार क्रमांक अनिवार्य मानला जातो. त्यामुळे कोणती योजना सुरू आहे किंवा बंद झाली आहे, याची नोंदही सरकारला ठेवता येते.
आधार कार्डचे महत्त्व
आधार कार्डचा उपयोग आपल्याला बँकेत खाते उघडण्यापासून ते मोबाईल नंबर लिंक करण्यापर्यंत अनेक ठिकाणी करावा लागतो. यात आपला पत्ता, लोकेशन आणि इतर वैयक्तिक माहिती समाविष्ट असते, याच पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार आता आधार कार्डला पर्याय म्हणून वर्च्युअल आयडी (VID) सुरू करत आहेत. या आयडीमुळे आधारशी संबंधित फसवणूक आणि असुरक्षित व्यवहार कमी होण्याची शक्यता आहे. वर्च्युअल आयडी हे आधार कार्डशी लिंक असलेले एक तात्पुरते नंबर असेल.
आधार कार्ड आता केवळ ओळखपत्र न राहता जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आवश्यक झाले आहे. शाळेच्या प्रवेशापासून बँकेतील व्यवहारांपर्यंत आधारशिवाय काहीच शक्य नाही. मात्र, यामुळे फसवणुकीच्या घटना देखील वाढल्या आहेत, विशेषतः बँक खाते आणि रेशनकार्डशी लिंक झाल्यानंतर. त्यामुळे आधार क्रमांक शेअर करताना अनेकांना भीती वाटते. पण, आधार क्रमांक न देता देखील महत्त्वाची कामे करता येऊ शकतात. यासाठी फक्त व्हर्च्युअल आधार आयडी तयार करावा लागेल.
VID म्हणजे काय?
व्हर्च्युअल आधार आयडी म्हणजे १६ अंकी पर्यायी क्रमांक, जो आधार क्रमांकाच्या जागी वापरता येतो. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे आणि कोणत्याही आधार कार्डधारकाला हा व्हर्च्युअल आयडी सहज निर्माण करता येतो. या आयडीचा उपयोग प्रमाणीकरण आणि ई-केवायसी प्रक्रियेसाठी केला जातो, त्यामुळे आधार क्रमांक शेअर करण्याची गरज उरत नाही. व्हर्च्युअल आयडीचा मोठा फायदा म्हणजे तो आधारशी लिंक असला तरी थेट आधार क्रमांक उघड करत नाही. गोपनीयता आणि सुरक्षितता अधिक मजबूत होते.
व्हर्च्युअल आयडी विविध शासकीय आणि खासगी सेवांसाठी उपयुक्त ठरतो. बँक खाते उघडणे, सरकारी योजनांसाठी अर्ज करणे, पासपोर्ट काढणे, विमा पॉलिसी खरेदी करणे आणि ई-आधार डाउनलोड करणे यांसारख्या कामांसाठी तो वापरला जाऊ शकतो. डिजिटल व्यवहार वाढत असताना, आधार क्रमांक शेअर करण्याऐवजी व्हर्च्युअल आयडी वापरणे सुरक्षित ठरते. हा क्रमांक ठरावीक कालावधीसाठी वैध असतो आणि वापरकर्त्याला आवश्यकतेनुसार तो पुन्हा निर्माण करता येतो.
व्हर्च्युअल आयडी तयार करण्याची प्रक्रिया?
1. UIDAI वेबसाइटला भेट द्या – भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. व्हीआयडी जनरेटर निवडा – “आधार सेवा” विभागात जाऊन “व्हर्च्युअल आयडी (VID) जनरेटर” या पर्यायावर क्लिक करा.
3. माहिती भरा – आधार क्रमांक आणि दिलेला कॅप्चा कोड प्रविष्ट करून सबमिट करा.
4. OTP तपासा – नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आलेला OTP प्रविष्ट करा आणि प्रक्रिया पूर्ण करा.
5. VID प्राप्त करा – तुमचा व्हर्च्युअल आयडी स्क्रीनवर दिसेल आणि तो नोंदणीकृत मोबाइलवरही पाठवला जाईल.
SMS द्वारा VID मिळवा
व्हर्च्युअल आयडी मिळवण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त एसएमएसचा पर्यायही उपलब्ध आहे. जर तुम्हाला आधारशी संबंधित व्हर्च्युअल आयडी हवी असेल, तर तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून एसएमएस पाठवू शकता. यासाठी, तुमच्या आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक आणि “RVID” हा शब्द एकत्र टाईप करा. त्यानंतर हा संदेश 1947 या क्रमांकावर पाठवा. हे करण्यास काही सेकंदच लागतात आणि तुम्हाला तुमच्या फोनवरच व्हर्च्युअल आयडी मिळेल.
उदाहरणार्थ, जर तुमच्या आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक 4565 असतील, तर तुम्हाला “RVID 4565” असा संदेश टाईप करून 1947 वर पाठवावा लागेल. काही क्षणांतच, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर व्हर्च्युअल आयडी प्राप्त होईल. हा पर्याय विशेषतः त्यावेळी उपयुक्त ठरतो जेव्हा इंटरनेट सुविधा सहज उपलब्ध नसते किंवा तुम्हाला त्वरीत व्हर्च्युअल आयडीची गरज असते. हा एक सुरक्षित आणि अधिकृत मार्ग आहे, जो आधारशी संबंधित सेवांमध्ये सोयीस्कर ठरतो.